
रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा तू झूठी मैं मक्कार हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून बाॅक्स आॅफिसवर तूफान कामगिरी करताना दिसत आहे. पहिल्यांदाच या चित्रपटाच्या माध्यमातून रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर हे स्क्रीन शेअर करताना दिसले.

रणबीर कपूर याच्या तू झूठी मैं मक्कार चित्रपटानंतर अक्षय कुमार याचा सेल्फी हा चित्रपट फ्लाॅप गेला. रणबीर कपूर याच्या तू झूठी मैं मक्कार या चित्रपटाला बाॅक्स आॅफिसवर धमाका करण्यात यश मिळाले.

विशेष म्हणजे प्रेक्षकांना रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांची जोडी आवडली. रणबीर कपूर हा तू झूठी मैं मक्कार चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसला. यावेळी त्याने आपल्या खासगी आयुष्याबद्दल देखील चाहत्यांना अपडेट दिली.

तू झूठी मैं मक्कार चित्रपटाने आता बाॅक्स आॅफिसवर जगभरातून तब्बल 200 कोटींचे कलेक्शन केले आहे. रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा हा चित्रपट 8 मार्चला रिलीज झाला होता.

तू झूठी मैं मक्कार चित्रपटाच्या निर्मात्यानी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याची माहिती चाहत्यांमध्ये शेअर केलीये. विशेष म्हणजे तू झूठी मैं मक्कार या चित्रपटाला विदेशातूनही मोठे प्रेम मिळाले आहे.