
रणवीर सिंग हा बॉलिवूडमधील प्रतिभावान कलाकारांपैकी एक आहे. तो आपल्या अभिनयानं जितकं जास्त प्रत्येकाचं मन जिंकतो तितकाच तो त्याच्या कपड्यांमुळे चर्चेत असतो.

आता रणवीरनं त्याच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

रणवीरनं गुच्चीचा पोशाख परिधान केला आहे आणि त्याचबरोबर त्यानं मोत्याचं नेकपीस कॅरी केलं आहे.

रणवीरच्या या लूकला सध्या सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.

रणवीरच्या व्यावसायिक आयुष्याविषयी सांगायचं झालं तर तो आता लवकरच 83 आणि सर्कस या चित्रपटात दिसणार आहे.