
झी मराठी या लोकप्रिय वाहिनीवर आता प्रेक्षकांना मनोरंजनाची नवी मेजवानी मिळाली आहे. नुकतंच सुरू झालेली “माझी तुझी रेशीमगाठ” (Majhi Tujhi Reshimgath) ही मालिका प्रेक्षकांचं मन जिंकतेय. या मालिकेतून अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) आणि अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

तब्बल दहा वर्षानंतर प्रार्थना बेहेरेनं छोट्या पडद्यावर पुरागमन केलंय. सुशांत सिंह राजपूतसोबत ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत झळकलेल्या प्रार्थनानं मराठी मालिका आणि चित्रपटांमधून काम केले आहे. बऱ्याच वर्षांच्या गॅपनंतर प्रार्थना पुन्हा छोट्या पडद्यावर झळकतेय.

श्रेयस आणि प्रार्थना सोबतच मालिकेत झळकणारी चिमुकली मायरा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. मालिका सुरु होताच मायरा प्रेक्षकांची लाडकी बनली आहे.

नेहमीप्रमाणेच झी मराठीच्या या नव्या मालिकेचं शीर्षकगीत देखील अतिशय कर्णमधुर झालं आहे. ‘धारा धारा.. बेभान वारा…’ अशा बोलीच हे गीत प्रेक्षकांच्या नक्कीच लक्षात राहील.

या मालिकेत काय सुरू आहे याची झलक प्रार्थना चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर करत असते आता नुकतंच तिने हे फोटो शेअर केले आहेत. सध्या “माझी तुझी रेशीमगाठ” मालिकेतील नेहा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय.