
रोशनी चोप्राने टीव्ही आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. रोशनीने 2004 मध्ये लेट्स एन्जॉय या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर ती ब्रह्मा चित्रपटात दिसली. मात्र, तिच्या या चित्रपटांना प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

रोशनी चोप्राला 2006 मध्ये आलेल्या कसम शोमधून लोकप्रियता मिळाली. रोशनीने या चित्रपटात बानी वालियाची भूमिका साकारली होती. तिला शोमध्ये सहाय्यक पात्र होतं, मात्र तरीही तिला या शोमध्ये चांगलीच पसंती मिळाली.

रोशनी मॅचपूर्वी आणि नंतरच्या क्रिकेट शो फोरथ अंपायरमध्ये प्रेझेंटर होती हा शो टेलिव्हिजनवर येत असे. तिने इंडियाज गॉट टॅलेंट आणि कॉमेडी शो सर्कस तीन का तडका होस्ट केले आहे. याशिवाय ती कपिल शर्माच्या शो कॉमेडी नाईट्स विथ कपिलमध्येही दिसली आहे.

रोशनी शेवटची 2017 मध्ये 'द ड्रामा कंपनी'मध्ये दिसली होती. या शोनंतर ती ना चित्रपटात दिसली ना टीव्हीमध्ये. सध्या ती मनोरंजन उद्योगातून दूर तिचा व्यवसाय सांभाळत आहे.

वास्तविक, रोशनीकडे RCDCनावाचे स्वतःचा कपड्यांचा ब्रॅड आहे. तिला तिच्या व्यवसायासह कुटुंबासोबत वेळ घालवणं आवडतं.