
टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैकने बिग बॉस 14 चं पर्व जिंकलं आहे. शोमध्ये तिचं व्यक्तिमत्व दिसलं. आता तिनं बिग बॉस 14 मध्ये परिधान केलेल्या तिच्या गाऊनचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.

सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैक ही बिग बॉस 14 ची विजेती ठरल्यानंतर कायम चर्चेत आहे. आता गाऊनचा लिलाव करण्याच्या निर्णयावरुन ती चर्चेत आली आहे.

तिनं ट्रान्सजेंडर समुदायासाठी काम करणाऱ्या ऑनलाईन चॅरिटी सेलमध्ये तिच्या गाऊनचा लिलाव करण्याचा विचार केला आहे. बिग बॉस 14 मधील एन्ट्री आणि फिनालेला तिनं हे गाऊन परिधान केले होते.

नुकतंच ईटाइम्स टीव्हीशी बोलताना रुबिनानं याबद्दल सांगितलं. तिनं एलजीबीटीक्यू समुदायाशी संबंधीत असलेल्या एसोसिएशनबद्दल माहिती दिली.

कलर्सवरील शो ‘शक्तीः अस्तित्व के एहसास की’मध्ये रुबीना दिसली होती. ती अनेक दिवसांपासून या शोचा एक भाग आहे. शोमध्ये ती किन्नर बहुच्या भूमिकेत आहे. रुबिना ही टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री आहे. छोटी बहु या शोमधून तिला ओळख मिळाली. तिचा अभिनय चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेचा विषय ठरतो आहे.