
बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा नेहमीच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, सलमान खान याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद हा अजिबातच मिळाला नाही.

सलमान खान हा सध्या दुबईमध्ये असून इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्ड्सला त्याने हजेरी लावलीये. सलमान खान याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये सलमान खान याने फिट कसे राहिचे हे सांगितले आहे. हाॅटेलमधील लॉबीत ट्रोलीमध्ये भाच्यांना घेऊन सलमान खान फिरताना दिसत आहे. सलमान खान असे करत व्यायाम करताना दिसत आहे.

सलमान खान याचे हे फोटो आणि व्हिडीओ पाहून त्याच्या फिटनेसचे रहस्य उघडकीस झाली. लहान मुलांसोबत धमाल करताना सलमान खान हा दिसत आहे.

सलमान खान हा नेहमीच लहान मुलांसोबत मस्ती करताना दिसतो. याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो हे सोशल मीडियावर बघायला मिळतात. दुबईमध्ये धमाल करताना सलमान दिसतोय.