
बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाने धमाका केला.

शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने धमाकेदार कामगिरी केलीये. या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड मोडले आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान याने तब्बल चार वर्षांनंतर चित्रपटांमध्ये पुनरागमन केले.

पठाण चित्रपटातील खास गोष्ट म्हणजे या चित्रपटात फक्त शाहरुख खान हाच नाहीतर सलमान खान याची झलकही चाहत्यांना बघायला मिळालीये. पठाण ज्यावेळी अडचणीत होता, त्यावेळी सलमान खान त्याच्या मदतीला गेल्याचे दिसले.

नुकताच तरण आदर्श यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे. यशराज फिल्म्सने मोठी घोषणा केलीये.

आता पठाण आणि टायगरमधील मैत्री ही दुश्मनीमध्ये बदलणार आहे. तरण आदर्श यांच्या ट्विटनुसार त्यांनी यशराज फिल्म्सच्या आगामी चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये टायगर Vs पठाण असा टॅग दिला आहे.