
टॉलिवूडसोबतच बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हिने आपल्या सौंदर्याने खास ओळख मिळवलीये. समंथा रुथ प्रभू हिने अनेक चित्रपटांमध्ये धमाकेदार भूमिका केल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच समंथा रुथ प्रभू हिने मुंबईमध्ये नवे घर खरेदी केले. समंथा रुथ प्रभू हिने अत्यंत आलिशान घराची खरेदी केली. 15 कोटींचे घर समंथा हिने खरेदी केले.

रिपोर्टनुसार आता मुंबईनंतर समंथा रुथ प्रभू हिने हैद्राबादमध्ये आलिशान घर खरेदी केले आहे. समंथा रुथ प्रभू हिने खरेदी केलेल्या फ्लॅटची किंमत 7.8 कोटी आहे.

समंथा रुथ प्रभू हिने हैद्राबादमध्ये लॅविश 3 बीएचके फ्लॅट खरेदी केला आहे. विशेष म्हणजे समंथा रुथ प्रभू हिचा हा फ्लॅट अत्यंत आलिशान आहे. या घरामध्ये 6 पार्किंग स्लॉट आहेत.

ज्युबली हिल्समध्ये 100 कोटींचे आलिशान घर देखील समंथा रुथ प्रभू हिचे आहे आणि आता अभिनेत्री अजून एक आलिशान फ्लॅट हा खरेदी केला आहे.