
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात.

तिच्या डान्सचे व्हिडीओ आणि फोटोशूट्स सहसा बघायला मिळतात मात्र यावेळी तिनं तिच्या वर्कआउटचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

या व्हिडीओमध्ये सारा वर्कआऊट करताना दिसतेय. व्हिडीओमध्ये ती कधीकधी ट्रेडमिलवर धावताना दिसली आहे तर काहीवेळा ती डंबेल उचलताना दिसली आहे. साराचे हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

सारा अली खाननं तिचे वर्कआउट व्हिडीओ आणि फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये सारानं ब्लॅक कलरचा वर्कआउट ड्रेस परिधान केला आहे.

चाहत्यांसह बॉलिवूड सेलेब्सही यावर कमेंट करून साराचं कौतुक करत आहेत. यासह सारानं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे 'जागे व्हा, उडी मारा, पुश अप करा, डोके वर काढा, बर्न व्हा, लेव्हल अप'.

साराच्या या फोटो आणि व्हिडीओला लाखो लाईक्स मिळत आहेत. दुसरीकडे, सारा अली खानच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती अखेर वरुण धवनसोबत 'कुली नंबर 1' चित्रपटात दिसली होती. कोरोनामुळे त्यांचा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. यानंतर सारा आता अक्षय कुमार आणि धनुषसोबत ‘अतरंगी रे’ चित्रपटात दिसणार आहे.