
सतीश कौशिक यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. वयाच्या 66 व्या वर्षी सतीश कौशिक यांनी शेवटच्या श्वास घेतला. अनुपम खेर यांनी सतीश कौशिक यांच्या निधनाची बातमी सांगितली.

सतीश कौशिक यांचे निधन झाल्यानंतर आता अनेक मोठे खुलासे होताना दिसत आहेत. विकास मालू यांच्या फॉर्म हाऊसमध्ये सतीश कौशिश हे पार्टीसाठी पोहचले होते.

हदयविकाराच्या झटक्याने सतीश कौशिक यांचे निधन झाले आहे. मात्र, विकास मालू यांच्या फॉर्म हाऊसवर पोलिसांना काही आक्षेपार्ह औषधे सापडली यामुळे शंका उपस्थित केली जातंय.

आता या सर्वांमध्ये विकास मालू यांची पत्नी सान्वी मालू हिने गंभीर आरोप केले आहेत. सान्वी हिने आपल्याच पतीवर सतीश कौशिकची हत्या केल्याचा आरोप केला आहे. इतकेच नाहीतर याबद्दल एक पत्र तिने थेट पोलिस कमिश्नरला पाठवले आहे.

सान्वी मालू ही विकास मालू यांची दुसरी पत्नी असून तिने काही दिवसांपूर्वीच विकास मालू यांच्यावर बलात्काराचा आरोप केलाय. विकास मालू यानेच सतीश कौशिकला ड्रग दिल्याचे देखील म्हटले. रिपोर्ट्सनुसार, सान्वी मालू ही कायमच सोशल मीडियावर विविध मुद्द्यांवर आपले मत मांडते.