
मुंबई-गोवा क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने अटक केलं. या अटकेनंतर बॉलिवूड विश्वात चांगलीच खळबळ उडाली आहे. आता क्रूझवर झालेल्या या पार्टीचे काही इनसाईड फोटो समोर आले आहेत.

याच पार्टीतून आर्यन खानला NCBने अटक केली आणि त्याच्यावर कारवाई सुरू करण्यात आली. आर्यन खान सध्या पोलीस कोठडीत असून त्याला आज जामीन मिळण्याची शक्यता आहे.

या सर्व फोटोमध्ये कोरोनाचे नियम धाब्यावर मारून अनेकजण एकच ठिकणी जमा झालेले दिसून येतं आहे. या पार्टीमध्ये अनेक जण धुम्रपान,आणि दारू पिताना देखील दिसतं आहेत.

या पार्टीमध्ये डोळ्यांना दिपणारी प्रकाशयोजना करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे तेथे जमा असलेले लोक बेधंद होऊन गाण्यावरती नाचत असल्याचेही दिसून येत आहे.

एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यनने चौकशी दरम्यान कोठडीत कबूल केले आहे की तो गेल्या चार वर्षांपासून ड्रग्ज घेत होता. त्याने केवळ भारतातच नाही तर दुबई, यूके आणि इतर अनेक देशांतही अंमली पदार्थांचे सेवन केले आहे.

एनसीबीच्या वकिलांनी या आरोपींची दोन दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र कोर्टानं या तीन आरोपींना एक दिवसाची कोठडी सुनवली होती.

या दरम्यान NCB ने शाहरुख खानला आर्यनसोबत केवळ दोनच मिनिटं फोनवर बोलण्याची परवानगी दिली होती

चौकशीदरम्यान आणि वडिलांशी फोनवर बोलतानाही आर्यन सातत्याने रडत असल्याची बाब समोर आली आहे. आता आर्यनचे पुढे काय होणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.