
नुकताच काॅमेडियन कपिल शर्मा हा आज तकच्या शोमध्ये पोहचला होता. यावेळी कपिल शर्मा याने काही मोठे खुलासे केले आहेत. कपिल शर्मा याने तो डिप्रेशनमध्ये असताना काय घडत होते हे सांगितले आहे.

कपिल शर्मा म्हटला की, बऱ्याच वेळा मी शोचे शूटिंग अचानक रद्द करत असल्याने बाॅलिवूड स्टार नाराज होत होते. शाहरुख खान हा सेटवर 1 वाजता येत असल्याचे कळता चार तास अगोदर मी शूटिंग सुरू केली.

शाहरुख खान येण्याच्या पंधरा मिनिटे अगोदर मी सेटवरून गायब झालो. त्यानंतर शाहरुख खान याचे शूटिंग रद्द करण्यात आले. दोन चार आठवडे यासर्व गोष्टीमध्ये गेले.

शाहरुख खान हा मला भेटण्यासाठी खास फिल्मसिटीमध्ये आला. त्याने त्याच्या गाडीमध्ये बसून मला तब्बल एका तास समजावले आणि विचारे की, काही ड्रग्स वगैरेची सवय लागली तर नाही ना?

यावर मी सरळ नाही म्हणालो. कारण मी त्यावेळी डिप्रेशनमध्ये होतो. मला काम करण्याची इच्छा राहिली नव्हती. त्यानंतर गिन्नीने मला विदेशात नेले आणि काही गोष्टीमध्ये बदल झाले.