
शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीजच्या पहिल्याच दिवसापासून अनेक रेकाॅर्ड हे आपल्या नावावर करत आहे. चित्रपटाने धमाकेदार ओपनिंग केली होती. आता ही बाॅक्स आॅफिसवर पठाण चित्रपटाची क्रेझ बघायला मिळत आहे.

शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट २५ जानेवारी रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरातून तब्बल १०० कोटींचे कलेक्शन करत अनेकांना मोठा धक्का दिला

आता शाहरुख खान याच्या चित्रपटाला रिलीज होऊन तब्बल १५ दिवस होऊन गेले आहेत. हिंदी भाषेमध्ये पठाण चित्रपटाने आतापर्यंत ४४२.५० कोटीचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले आहे.

जगभरातून पठाण चित्रपटाने ८८८ कोटीचे कलेक्शन केले असून लवकरच ९०० कोटींचे कलेक्शन पठाण चित्रपट करत एक नवा रेकाॅर्ड तयार करेल.

शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. २०१९ मध्ये शेवटी शाहरुख खान याचा झिरो हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, हा चित्रपट फ्लाॅप गेला.