
शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असून ती तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. शमिता 42 वर्षांची असून तिचं लग्न झालेलं नाही. ती आपली बहीण शिल्पा आणि राज कुंद्रासोबत मुंबईत राहते.

शमिताने ‘मोहब्बतें’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. मात्र ती स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी होऊ शकली नाही. तिनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं पण ते चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास जादू दाखवू शकले नाहीत.

चित्रपटांमध्ये यश न मिळाल्यानं शमितानं अभिनयाच्या जगाला निरोप दिला. आता ती तिचा व्यवसाय करते.

शमिताने पुन्हा एकदा अभिनयाच्या जगात प्रवेश केला आहे. यावेळी तिने डिजिटल माध्यमात पुनरागमन केलं आहे. काही काळापूर्वी रिलीज झालेल्या ब्लॅक विडो या वेब सिरीजमध्ये ती दिसली होती. या मालिकेत मोना सिंग आणि स्वस्तिक मुखर्जी शमितासोबत मुख्य भूमिकेत दिसले होते.

ब्लॅक विडो ही वेब सिरीज प्रेक्षकांना खूप आवडली. यासोबतच शमिताच्या कामाचे कौतुकही केले गेले आहे.

शमिता बॉलिवूडमध्ये काहीही जादू दाखवू शकली नाही मात्र ती एक आरामदायक आयुष्य जगते.