Sher Shivraj: दिग्पाल लांजेकरच्या ‘शेर शिवराज’मध्ये कलाकारांची तगडी फौज

| Updated on: Apr 18, 2022 | 7:45 AM

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील चौथा चित्रपट 'शेर शिवराज' (Sher Shivraj) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. किल्ले प्रतापगडावर महाराजांनी अफजलखानासारख्या बलाढ्य शत्रूला पराजित करत यमसदनास धाडलं होतं.

1 / 6
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील चौथा चित्रपट 'शेर शिवराज' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. किल्ले प्रतापगडावर महाराजांनी अफजलखानासारख्या बलाढ्य शत्रूला पराजित करत यमसदनास धाडलं होतं.

2 / 6
गनिमीकाव्याने  खेळले गेलेले हे युध्द आणि मिळवलेला प्रचंड विजय महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच विसरला जाऊ शकत नाही. शिवचरित्रातील ही यशस्वी गाथा ‘शेर शिवराज’ चित्रपटाच्या रुपाने २२ एप्रिलला मोठया पडदयावर येणार आहे.

3 / 6
‘शेर शिवराज’ चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराज तर बलाढ्य अफज़लखानाच्या रुपात मुकेश ऋषी दिसणार आहेत. चित्रपटातील काही कलाकारांच्या भूमिकांवरून ट्रेलरमध्ये पडदा उचलण्यात आला आहे.

4 / 6
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री इशा केसकर यामध्ये मातोश्री सईबाई राणीसरकार यांची भूमिका साकारणार आहे. 'तुमच्या वाटेतला अडथळा न होता तुमच्या वाटेवर तुमची सावली बनून रहायचं होतं,' असं कॅप्शन देत हा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला.

5 / 6
'आमच्या छात्या तुमच्यावरचं वार झेलायला हायीत राजं,' असं म्हणणारे सुभेदार तान्हाजी मालुसरेंची भूमिका अभिनेते अजय पूरकर साकारणार आहेत. अजय यांनी 'पावनखिंड'मध्ये बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका साकारली होती. त्यांना या नव्या भूमिकेत पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

6 / 6
राजगडावर बसलेल्या जगदंबेवरून आणि सह्याद्रीच्या शिखरांवर राज्य करणाऱ्या शंभू महादेवावरून आपला जीव भंडाऱ्यागत उधळून टाकायचा, असं म्हणणाऱ्या मातोश्री दिपाईआऊ बांदल यांची भूमिका अभिनेत्री दिप्ती केतकर साकारणार आहेत. याशिवाय चित्रपटात वर्षा उसगांवकर, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, अक्षय वाघमारे, विक्रम गायकवाड, आस्ताद काळे, वैभव मांगले, सुश्रुत मंकणी, माधवी निमकर, ऋषी सक्सेना अशी कलाकारांची तगडी फौज पहायला मिळणार आहे.