AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे तर दिल्लीच्या बॉसने नेमलेले मुख्यमंत्री; संजय राऊत यांचा फडणवीस यांच्यावर हल्लाबोल

संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. फडणवीस हे 'दिल्लीच्या बॉसने नेमलेले मुख्यमंत्री' असून, त्यांची मुख्यमंत्रिपदाची भाषा अयोग्य असल्याचे राऊत म्हणाले. विरोधकांच्या 'कुबुद्धी'वरील टिप्पणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, 'कर्तबगारीवर मुख्यमंत्री झालेल्यांनी अशी भाषा वापरली नसती,' असे त्यांनी ठणकावले.

हे तर दिल्लीच्या बॉसने नेमलेले मुख्यमंत्री; संजय राऊत यांचा फडणवीस यांच्यावर हल्लाबोल
sanjay raut Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 26, 2026 | 1:16 PM
Share

विरोधकांना सुबुद्धी यावी आणि त्यांच्या कुबुद्धीचे विसर्जन व्हावे, अशी प्रार्थना मी गणपती बाप्पाला केली आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना म्हटलंय. मुख्यमंत्र्यांच्या या प्रतिक्रियेवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. फडणवीस हे काही स्वत:च्या कर्तबगारीवर मुख्यमंत्री झाले नाहीत. हे तर दिल्लीच्या बॉसने नेमलेले मुख्यमंत्री आहेत. ते स्वत:च्या कर्तबगारीवर मुख्यमंत्री झाले असते तर विरोधकांबाबत त्यांनी अशी भाषा केली नसती, असा हल्लाच संजय राऊत यांनी चढवला आहे.

मुख्यमंत्र्यांनी जशी प्रार्थना केली, आम्हीही तशीच गणपती बाप्पाकडे प्रार्थना केली आहे. महाराष्ट्रातील राजकीय, वैचारिक विरोधकांना जे आपले शत्रू समजतात त्यांचं कायमचं विसर्जन व्हावं, ही प्रार्थना आम्हीही केली आहे. प्रार्थना काय त्यांनाच करता येते का? अशा पद्धतीने विधान करणं मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. 11 दिवस घरी गणपती ठेवला. गणपती बुद्धीचं दैवत आहे. त्यांच्याकडून काय बुद्धी घेता तुम्ही? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

रेडीमेड मुख्यमंत्रीपद मिळालं…

तुम्ही विरोधकांना कुबुद्धी म्हणता. विरोधकांनी काय म्हटलंय? दुष्काळ जाहीर करा, चारा छावण्या सुरू करा, या मागण्यांना तुम्ही कुबुद्धी म्हणता? विरोधकांनी असं काय केलं की त्यांना कुबुद्धी म्हणायला निघाला? मुख्यमंत्र्यांना भारताचं संविधान वाचायला दिलं पाहिजे. त्यांना रेडीमेड मुख्यमंत्रीपद मिळालं आहे. संघर्ष करून मिळालं नाही. राजकीय संघर्ष करून जो पद मिळवतो, त्याचा विचार सर्वसमावेशक असतो. सर्वमान्य असतो. हे दिल्लीतल्या बॉसने नेमलेले मुख्यमंत्री आहेत. स्वत:च्या कर्तबगारीवर मुख्यमंत्री झाले असते तर त्यांनी अशी भाषा वापरली नसती. ही भाषा विरोधकांच्या बाबत केली नसती, अशी टीका राऊत यांनी केली.

यांना कोणता संस्कार?

या आधीच्या कोणत्याही मुख्यमंत्र्याने अशी भाषा केली नाही. आमचं सरकार आलं तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी कधीच अशी भाषा केली नाही. मनोहर जोशी कधी अशा भाषेत बोलले नाहीत. नारायण राणेही शिवसेनेचे मुख्यमंत्री होते. त्यांनीही कधी अशी भाषा केली नाही. कारण बाळासाहेबांचा संस्कार होता. फडणवीस यांना कोणता संस्कार आहे? राजकीय विरोधकांना दुश्मन मानून चिरडणे हाच यांचा संस्कार आहे, असा हल्लाच त्यांनी चढवला.

यांचंच विसर्जन करा

विरोधकांनी भ्रष्टाचाराची प्रकरणे काढली ही कुबुद्धी आहे का? ज्ञानेश कुमार यांच्या भ्रष्टाचारावर बोलले ही कुबुद्धी आहे का? तोंडाला येईल ते बोलायचं हे योग्य नाही. पुरोगामी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असं विधान करणं शोभत नाही. जो मुख्यमंत्री दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नेमू देत नाही, त्याच्याकडून काय अपेक्षा करणार? असा सवाल करताना यांचंच विसर्जन करा. हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. देशाचे दुश्मन आहेत, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

Follow Us
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन