
शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करते. दरवर्षी ती पती राज कुंद्रासोबत (Raj Kundra) बाप्पाला घरी आणते, पण यावेळी ती एकटीच बाप्पाला घेऊन आली.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी प्रत्येक सण मोठ्या थाटामाटात साजरा करते. दरवर्षी गणेशोत्सवात शिल्पा गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणते.

मात्र, शिल्पा दरवर्षी पती राज कुंद्रासोबत गणपती बाप्पाचे घरी स्वागत करते, पण यावेळी ती एकटीच बाप्पाला घेऊन आली आहे. शिल्पा बाप्पाची मूर्ती घेण्यासाठी पोहोचली, तेव्हा चाहत्यांची आणि फोटोग्राफर्सची गर्दी झाली होती. प्रत्येकजण अभिनेत्रीचे फोटो काढण्यासाठी धडपड करत होता.

शिल्पा बाप्पाची मूर्ती घेण्यासाठी पोहोचली, तेव्हा चाहत्यांची आणि फोटोग्राफर्सची तुफान गर्दी झाली होती. प्रत्येकजण अभिनेत्रीचे फोटो काढण्यात व्यस्त होता.

या गर्दीमुळे शिल्पा खूप अस्वस्थ झाली. अनेक वेळा त्याने सर्वांना दूर राहण्यास सांगितले. पण या जमावाने काही तिचे ऐकले नाही.

यानंतर शिल्पा शेट्टीने स्वतः बाप्पाला तिच्या गाडीत स्थानापन्न केले आणि मग त्याला घरी घेऊन गेली.

शिल्पा यंदाच्या वर्षी राज कुंद्राशिवाय केवळ मुलं आणि कुटुंबासह ही गणेश चतुर्थी साजरी करणार आहे. यावेळी पती सोबत नसल्याने शिल्पाच्या लेकाने अर्थात वियान कुंद्राने नारळ वाढवून बाप्पाचं स्वागत केलं.