
सलमान खानचा प्रसिध्द शो बिग बाॅसचे 16 वा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेहमीच बिग बाॅस हा शो चर्चेत असतो. यंदा बिग बाॅसमध्ये एका मोठ्या अभिनेत्रीचा पती येणार असल्याची चर्चा सुरूयं.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा हा बिग बाॅसच्या घरात येणार असल्याची चर्चा आहे. या अगोदर शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शोमध्ये आली होती.

रिपोर्टनुसार राज आणि शोच्या निर्मात्यामध्ये चर्चा सुरू असून ते 'बिग बॉस 16' मध्ये सहभागी होण्याचा विचार करत आहेत.

काही दिवसांपूर्वी राज कुंद्रावर अनेक आरोप झाले, इतकेच नाही तर राज यांना काही दिवस जेलमध्ये देखील राहावे लागले होते.

असे सांगितले जात आहे की, लोकांसमोर आपली बाजू मांडण्याची राज यांना बिग बाॅसचे घर उत्तम वाटते आहे. येत्या काही दिवसांमध्ये हे स्पष्ट होईल की, खरोखरच राज कुंद्रा हे बिग बाॅसच्या घरात येणार आहेत की नाही हे.