
बिग बाॅस 16 मध्ये शिव ठाकरे याने धमाकेदार गेम खेळला आहे. शिव ठाकरे याला खरी ओळख ही बिग बाॅस 16 मधूनच मिळालीये. विशेष म्हणजे शिव ठाकरे हा बिग बाॅस मराठीचा विजेता देखील आहे.

काही दिवसांपूर्वीच शिव ठाकरे याने जाहिर केले की, तो खतरो के खिलाडीमध्ये सहभागी होत आहे. हा शिव ठाकरे याचा तिसरा रिअॅलिटी शो असणार आहे. अगदी कमी कालावधीमध्ये शिव ठाकरे याची जबरदस्त फॅन फाॅलोइंग झालीये.

शिव ठाकरे याला दोन मोठ्या चित्रपटांच्या आॅफर आला होत्या. मात्र, चक्क शिव ठाकरे याने या चित्रपटांना नकार दिलाय. शिव ठाकरे याने चित्रपटाला नकार दिल्याचे कळताच त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.

शिव ठाकरे याने अखेर या चित्रपटांना नकार देण्याचे कारणही जाहिर केले आहे. शिव ठाकरे म्हणाला की, मोठ्या चित्रपट निर्मात्यांकडून मला चित्रपटाची आॅफर आली होती. मात्र, मी चित्रपटाला नकार दिलाय.

दोन्ही चित्रपटांचे शूटिंग हे एप्रिलमध्ये सुरू होणार होते आणि मे मध्ये संपणार होते. दोन्हींच्याही तारखा सारख्याच होत्या, त्यामुळे समस्या होती. यामुळे मी चित्रपटाला नकार दिला. आता खतरो के खिलाडीचे सीजनही सुरू होणार आहे.