
बाॅलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या तू झुठी मैं मक्कार या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर तूफान अशी कामगिरी केलीये. श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसले.

तू झुठी मैं मक्कार या चित्रपटामध्ये श्रद्धा कपूर ही बिकिनीमध्ये दिसली. श्रद्धा कपूर हिच्या या लूकची जबरदस्त चर्चा रंगताना दिसली. तू झुठी मैं मक्कार या चित्रपटासाठी श्रद्धा कपूर हिने वजन कमी केले.

श्रद्धा कपूर हिची बिकिनी आणि टोन्ड बॉडी पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला. श्रद्धाने या बॉडीसाठी खूप मेहनत घेतलीये. श्रद्धाचा फिटनेस ट्रेनर महेक नायर याने श्रद्धा कपूर हिने किती जास्त मेहनत घेतलीये हे सांगितले आहे.

कितीही बिझी असली तरी श्रद्धा कपूर ही रोज वर्कआउट करत असत. वर्कआउट करण्यापूर्वी 5 मिनिटे श्रद्धा ध्यान करते. यानंतर ती 10 मिनिटे स्ट्रेचिंग आणि 10 मिनिटे मोबिलिटी ड्रिल करत. शेवटच्या 25 मिनिटांत जिम्नॅस्टिक करते.
