

कियारा आडवाणी ही विमानतळावर स्पाॅट झालीये. यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये कियारा आडवाणी ही पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत आहे.

कियारा आडवाणी हिला मुंबई विमानतळावर घेण्यासाठी स्वत: सिद्धार्थ मल्होत्रा हा पोहचला होता. याचा व्हिडीओ पाहून चाहते आनंदी झाले आहेत. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा हा गाडीमध्ये बसलेला दिसत आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा हा कियारा आडवाणी हिची कशाप्रकारे काळजी घेत आहे, या व्हिडीओमधून स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते देखील आनंदी झाले आहेत.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांचे लग्न राजस्थानमध्ये पार पडले. या लग्नाला बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली. या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले.