लग्नानंतर सोनाक्षी सिन्हाने पोस्ट केले ग्लॅमरस फोटो, कमेंट करत नवरा म्हणाला…
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या लग्नामुळे तुफान चर्चेत आहेत. आता देखील अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहे. आता अभिनेत्री लग्नातील नाही तर, नव्या फोटोशूटचे फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षी हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे..

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. आता अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सोनाक्षी हिने वेस्टर्न लूकमध्ये काही फोटो पोस्ट केले आहे फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

फक्त चाहतेच नाही तर, अभिनेत्रीचा पती झहीर इक्बाल देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर फिदा झाला आहे. पत्नीच्या फोटोंवर कमेंट करत झहीर म्हणाला 'आय लव्ह यू...'

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, सात वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

अभिनेत्री सोनाक्षी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे.