
नुकताच सोनाली हिने कुटुंबासोबत काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री पती आणि मुलासोबत आनंदी दिसत आहे.

सोनली बेंद्रे हिने 2002 मध्ये खास मित्र गोल्डी बहल यांच्यासोबत लग्न केलं. एका मुलाखतीत अभिनेत्रीने 'मी माझ्या मित्रासोबत लग्न केलंय...' असं वक्तव्य देखील केलं होतं.

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. करियरच्या सुरुवातीला सोनाली हिने अनेक जाहिरातींमध्ये काम करत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सिनेमांमध्ये पदार्पण केल्यानंतर अभिनेत्रीने सोनाली हिने स्माईल आणि सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केलं.

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.