
अभिनेत्री सोनाली बेंद्रे आता अभिनय विश्वात सक्रिय नसली तरी अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर सोनाली हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

आता देखील सोनाली हिने काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, ''प्रत्येक रात्र एक चांगल्या सेल्फीस पात्र आहे...' असं लिहिलं आहे.

सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. तर अभिनेत्रीच्या कॅप्शनने देखील चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

वयाच्या 48 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. आजही सोनाली वेस्टर्न आणि पारंपरिक लूकमध्ये प्रचंड सुंदर दिसते.

सांगायचं झालं तर, एक काळ असा होता, जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाली हिच्या लूकची आणि अभिनयाची चर्चा रंगलेली असायची..