
फॅशन जगतातील बहुप्रतिक्षित शो आणि वर्ष 2021 चा मेट गाला रेड कार्पेटमध्ये अनेक कलाकारांनी आपल्या स्टाईलची जादू दाखवली. हॉलिवूड स्टार्स जेनिफर लोपेझ, किम कार्दशियन, मेगन फॉक्स यांनी आपल्या फॅशनचा जलवा दाखवला. भारताच्या सुधा रेड्डीचाही या यादीत समावेश आहे.

यावेळी रेड्डी मेट गालामध्ये आपली उपस्थिती नोंदवण्यासाठी भारतातून पोहोचली होती. येथे पोहोचणारी ती एकमेव भारतीय सेलिब्रिटी होती.

सुधा रेड्डी हैदराबाद स्थित उद्योजकही आहेत.

सुधा रेड्डी या हैदराबादस्थित बिलिनीयर उद्योगपती मेघ कृष्णा रेड्डी यांच्या पत्नी आहेत.

या दरम्यान तिने प्रसिद्ध फॅशन डिझायनर जोडी फाल्गुनी आणि शेन मयूर यांचा डिझायनर ड्रेस परिधान केला होता.

सुधा रेड्डीची स्टाईल प्रत्येकाच्या पसंतीस उतरली आहे.