
सुहाना खान कायमच चर्चेत असते. सोशल मीडियावर सुहाना सक्रिय असून चाहत्यांसाठी फोटो कायमच शेअर करते. इन्स्टाग्रामवर बोल्ड लूकचे फोटो काही दिवसांपूर्वी सुहानाने शेअर केले होते.

नुकतेच सुहाना खान एअरपोर्टवर स्पॉट झालीयं. सुहाना आई गौरी खानसोबत एअरपोर्टवर दिसलीयं. एअरपोर्टवर दोघीही खास लूकमध्ये दिसून आल्या.

सुहाना खानने पांढरा क्रॉप टॉप आणि जॉगरसह स्काय ब्लू कलरची बॅग कॅरी केली होती. सुहानाचा लूक एकदम जबरदस्त दिसत होता.

विशेष म्हणजे एअरपोर्टवर सुहाना तिच्या चाहत्यांसोबत फोटो काढताना देखील दिसून आली. हे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

'द आर्चिज' चित्रपटामुळे सुहाना सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाद्वारे सुहानासोबत खुशी कपूर आणि बिग बीचा नातू दिसणार आहेत.