
सनी लिओनी ही नेहमीच चर्चेत असते. सनी लिओनी सोशल मीडियावरही सक्रिय असून नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकताच सनी लिओनी हिने अत्यंत मोठा खुलासा केला आहे.

सनी लिओनी म्हणाली की, ज्यावेळी मला बिग बाॅसची आॅफर आली. त्यावेळी मी त्यांना स्पष्ट नकार दिला आणि याबद्दल माझ्या पतीला सांगितले. नकार देऊनही परत परत मला बिग बाॅसच्या निर्मात्यांचा फोन येत होता.

मी माझ्या पतीला म्हणाले की, भारतातील लोक माझा द्वेष करतात मला तिथे जायचे नाही. परंतू मी अचानकच बिग बाॅससाठी होकार दिला. त्यानंतर अनेकांनी मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या.

मी हिंमत करून शेवटी शोमध्ये सहभागी झाले. बिग बाॅसच्या 14 व्या आठवड्यामध्ये मला महेश भट्ट यांचा चित्रपट मिळाला. त्यानंतर मला एक वेगळी ओळख ही नक्कीच मिळाली.

भारतामधील लोकांनी माझ्याकडे थोड्या वेगळ्या आणि चांगल्या नजरेने पाहण्यास सुरूवात केली. या मुलाखतीमध्ये भारतामधील लोक आपल्याला काय काय बोलत होते हे सांगताना सनी लिओनी दिसली.