
अभिनेत्री सनी लियोनी हिने एका मुलाखतीत तिच्या 4 मुलींबद्दल मोठा खुलासा केला होता. अभिनेत्रीने 6 एग्स फ्रिज केले होते. त्यामध्ये 4 मुली होत्या आणि 2 मुलं होतं. अमेरिकेत जन्माआधी बाळाचं लिंग सांगतात असं देखील अभिनेत्री म्हणाली होती.

अभिनेत्री म्हणाली, 'मी सुरुवातीला 4 मुलींचा विचार केला. पण मी माझ्या चारही मुलींना गमावलं. ज्यामुळे मला प्रचंड त्रास झाला. चारही मुलींचं मी IVF च्या माध्यमातून जगात स्वागत करणार होती. पण तसं होऊ शकलं नाही.'

डॅनियल आणि मला मुली हव्या होत्या... असं देखील अभिनेत्री मुलखातीत म्हणाली होती. पुढे सनी म्हणाली, 'अंधेरीमध्ये एक जागा आहे, जेथे लहान - लहान मुली होत्या. मी एका मुलीला तेथून दत्तक घेतलं.'

सनी कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सनी हिचे दोन मुलं आणि एका मुलीसोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सनीच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.

सनी लियोनी हिने बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते.