
प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेता सुयश टिळक आणि रिअॅलिटी टीव्ही शो मराठी डान्सिंग क्वीन फेम आयुषी भावे यांनी नुकतेच 21 ऑक्टोबरला लग्नगाठ बांधली आहे. गेले दोन दिवस या दोघांच्या लग्नविधीचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होते. आता लग्नाचे हे फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

अहवालांनुसार, या दोघांनी कोरोना परिस्थितीमुळे जवळचे मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली आहे.

अगदी पारंपारिक पद्धतीने हा सोहळा पार पडला आहे. या फोटोंमध्ये दोघंही प्रचंड सुंदर दिसत आहेत. प्रसिद्ध फोटोग्राफर पराग सावंतनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत.

7 जुलै रोजी सुयशने त्याची मैत्रीण आयुषीसोबत साखरपुडा केला होता. सुयशने आयुषीच्या वाढदिवशी त्यांच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना ही गोड बातमी दिली होती.

या दोघांच्या प्रोफेशनल लाईफ बद्दल बोलायचं झालं तर, आयुषी भावे एक सुप्रसिद्ध अभिनेत्री तसेच उत्तम डान्सर आहे. ती लवकरच चित्रपटांमध्ये झळकणार आहे. दरम्यान, सुयश एक मराठी अभिनेता आहे. त्याने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहे. नुकतंच 'शुभमंगल ऑनलाईन' या मराठी टीव्ही शो मधून त्याने शंतनूची भूमिका साकारत घराघरात स्थान मिळवलं आहे.