
सध्या नवरात्री हा सण जोशात साजरा केला गेला आहे. या दिवसांत नऊ रंगांना विशेष स्थानं दिलं जातं. सगळ्या स्त्रिया या दिवसांत प्रत्येक दिवशीच्या रंगानुसार पेहराव परिधान करतात. आता आज दसऱ्याचा सर्वत्र उत्साह पाहायला मिळतोय.

आजचा रंग ‘जांभळा’आहे. या ट्रेंडची भुरळ अभिनेत्रीना नाही पडली तर नवलच! अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने गेले नऊ दिवस देवीचे वेगवेगळे लूक साकारले, आता दसऱ्याच्या दिवशी अपूर्वानं लक्ष्मीचा लूक साकारत फोटो शेअर केले आहेत.

या लूकला चाहत्यांनीही पसंतीस दर्शवली आहे. ती अगदी लक्ष्मी सारखीच दिसतेय.

छोट्या पडद्यावरची बहुचर्चित मालिका ‘रात्रीस खेळ चाले’मधील शेवंतानं चाहत्यांच्या मनावर एक वेगळी छाप पाडली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात तिचे लाखो चाहते आहेत.

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती सतत आपल्या चाहत्यांशी संपर्कात असते. नेहमी नवनवीन फोटोशूट करून त्यातील फोटो देखील ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिचे फोटो चाहत्यांच्या पसंतीसही उतरतात.