
नुकतंच सोशल मीडियावर अभिनेत्री सोनम कपूरने फोटो धुमाकूळ घालत आहेत. आता तिचा हा अवतार चाहत्यांच्या पसंतीस उतरतोय. मात्र तिच्या ड्रेसपेक्षा तिच्या बॅगची सोशल मीडियावर जास्त चर्चा होत आहे.

सोनम कपूरनं लुई व्ह्यूटन या ब्रँडचा ब्लॅक क्रॉप टॉप परिधान केला होता आणि कार्गो पँट्स कॅरी केले होते. फॅशनच्या बाबतीत तिचा हा ड्रेस प्रचंड आकर्षक आहे.

सोनमच्या या क्रॉप टॉपची किंमत लुई व्ह्यूटनच्या वेबसाईटवर सुमारे 1, 94, 862 रुपये आहे. तर कार्गो पॅन्टची किंमत 1, 54, 984 रुपये आहे.

सोनम कपूरने तिच्या ग्लॅम लूकसाठी न्यूड पिंक लिपस्टिक, गुलाबी ब्लश चीक्स, स्मोकी आय मेकअप केलंय. या कपड्यांमध्ये सोनम खूपच सुंदर दिसत आहे.

सोनम कपूरच्या या लूकशिवाय तिच्या बॅगचीही सोशल मीडियावर चर्चा आहे. लुई व्ह्यूटनच्या वेबसाइटवर तिच्या बॅगची किंमत अंदाजे 3, 45, 442 रुपये आहे.