
बिग बाॅस १६ चा फिनाले काही तासावर आला आहे. सोशल मीडियावर फक्त बिग बाॅसच्या विजेत्याची चर्चा होताना दिसत आहे. शिव ठाकरे, एमसी स्टॅन आणि प्रियंका चाैधरी यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

बिग बाॅस १६ चा ग्रँड फिनाले १२ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्री ९ वाजता सुरू होईल. साधारण रात्री १२ वाजेपर्यंत सलमान खान हा बिग बाॅस १६ च्या विजेत्याचे नाव जाहिर करेल.

बिग बाॅस १६ च्या विजेत्याला २१ लाख ८० हजाराची रक्कम दिली जाईल. यासोबतच बिग बाॅसच्या विजेत्याला एक ट्रॉफी देखील मिळेल. बिग बाॅस १६ हे टीआरपीमध्ये टाॅपमध्ये राहिले आहे.

फिनालेला अवघे दोन दिवस शिल्लक असताना देखील बिग बाॅसच्या घरात अर्चना गाैतम आणि प्रियंका चाैधरी भांडताना दिसल्या. इतकेच नाही तर एमसी स्टॅन आणि शालिन भमोटमध्येही वाद झाला होता.

गेल्या दोन विकेंडच्या वारला सलमान खान हा गैरहजर होता. यावेळी अगोदर फराह खान हिने शो होस्ट केला. दुसऱ्या वेळी करण जोहर याने शो होस्ट केला. आता फिनालेला सलमान खान शो होस्ट करताना दिसेल.