
बाॅलिवूडमधील काही अभिनेते प्रचंड रागीट आहेत. या अभिनेत्यांना आपला राग नियंत्रणात ठेवता येत नाही. परिणामी सार्वजनिक ठिकाणी हे चाहत्यांवर भडकताना दिसतात. हे अभिनेते नेमके कोणते याबद्दल जाणून घेऊयात.

रणबीर कपूर याचा काही दिवसांपूर्वीच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये रणबीर कपूर याच्यासोबत एक चाहता सेल्फी घेत होता. मात्र, रागात त्या चाहत्याचा फोन फेकून देताना रणबीर कपूर हा दिसला.

नुकताच बाॅलिवूड अभिनेता अजय देवगण याचा वाढदिवस झाला. अजय देवगण याला शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी एका चाहताचा हात ओढून बाजूला करताना अजय देवगण दिला. ज्यानंतर त्याच्यावर टिका करण्यात आली.

सलमान खान हा रागीट स्वभावाचा आहे, हे जवळपास सर्वांनाच माहिती आहे. बऱ्याच वेळा सलमान खान मीडियासमोरही रागात दिसतो. सलमान खान याचे अनेक व्हिडीओही व्हायरल होतात.

जॉन अब्राहम हा देखील प्रचंड रागीट आहे. अनेकदा चाहत्यांवर राग काढताना यापूर्वी जॉन अब्राहम हा दिसला आहे. ज्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

आलिया भट्ट हिचे वडील महेश भट्ट हे देखील प्रचंड रागीट आहेत. बऱ्याच वेळा कार्यक्रमांमध्येही महेश भट्ट ही चिडताना दिसले आहेत. काही दिवसांपूर्वीच महेश भट्ट यांनी काही मोठे खुलासे केले होते.