
बाॅलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने मैंने प्यार किया या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले. सलमान खान हा देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाचे अनेक किस्से गाजले आहेत.

मैंने प्यार किया चित्रपटाच्या शूटिंगवेळी असा एक किस्सा घडला की, त्यानंतर भाग्यश्री घाबरली. सलमान खान याने भाग्यश्रीच्या कानामध्ये असे काही बोलले की, सलमान खान याचे बोलणे ऐकून भाग्यश्रीला मोठा धक्का बसला.

चित्रपटाची शूटिंग सुरु असताना सलमान खान हा भाग्यश्री जवळ येतो आणि कानामध्ये चार शब्द बोलतो. सलमान भाग्यश्रीच्या कानामध्ये म्हणतो की, दिल दीवाना बिन सजना के...सलमान खान याचे हे बोलणे ऐकून तिला काहीच कळाले नाही.

याबद्दल स्वत: भाग्यश्री हिने एका मुलाखतीमध्ये सांगितले. विशेष म्हणजे फक्त एकच दिवस नाहीतर सतत सलमान खान हा भाग्यश्री हिच्या कानामध्ये हे चार शब्द बोलत होता.

यावर भाग्यश्री सलमान खान याला जाब विचारते तर सलमान खान म्हणतो की, मला सर्वकाही माहिती आहे. हिमालय दसानी सलमान खानचे मित्र असल्याने सलमान खान याला भाग्यश्रीबद्दल माहिती होते. त्यानंतर सलमान आणि भाग्यश्री चांगले मित्र झाले.