
सध्या कंगना रनौत बुडापेस्टमध्ये तिच्या आगामी 'धाकड' चित्रपटाचं शूटिंग करत आहे. कंगना शूटिंग दरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

आता नुकतंच कंगनानं तिचे काही फोटो शेअर केले आहेत ज्यात तिनं हिरव्या रंगाच्या ड्रेससह हिरव्या आणि पांढऱ्या रंगाचं पेंडेंट कॅरी केलं आहे. यामध्ये कंगना खूप सुंदर दिसत आहे.

हे फोटो शेअर करत कंगनानं गालिबची एक ओळ लिहिली आहे. तिनं लिहिलं, ‘निकलना खुल्द से आदम का सुनते आए हैं, लेकिन बहुत बे- आबरू होकगर तेरे कूचे से हम निकले.’

तसे, एकीकडे कंगना तिथे चित्रपटाच्या शूटिंगचा आनंद घेत आहे. दुसरीकडे मुंबईत तिच्यासाठी अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

जावेद अख्तर बदनामी प्रकरणात कोर्टाने कंगनाला पुढील सुनावणीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. जर कंगना आली नाही तर तिच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले जाईल.