
सध्या बॉलिवूड स्टार्स कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाच्या अफवा बॉलिवूडमध्ये खूप गाजत आहेत. हि जोडी डिसेंबरमध्ये ते लग्न करणार असल्याचं कळतंय. यादरम्यान विकी कौशलने भूमी पेडणेकर आणि कियारा अडवाणी यांच्या सहकलाकार असलेल्या 'गोविंदा नाम मेरा' या नवीन चित्रपटाची घोषणा केली.

या तिन्ही कलाकारांनी चित्रपटातील आपले लूक आज (12 नोव्हेंबर) प्रदर्शित केले आहेत. या पोस्टर्सवरून हा चित्रपट मनोरंजनाची धमाल असणार आहे, हे कळते आहे.

दुसरीकडे, आपल्या पात्राची ओळख करून देताना, कियारा अडवाणीने ट्विट केले की, "और ये हूं मैं! या कथेला नेमका तडका हवा होता आणि तोच मी घेऊन येत आहे! या वर्षातील सर्वात मोठ्या मनोरंजनाच्या धमाक्यात सामील व्हा’

अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने देखील या चित्रपटातील आपला लूक रिलीज केला आहे.0020;ती जेव्हा आजूबाजूला असते तेव्हा शांतता कधीच नसते, भेट ऑफिशियल मिसेस वाघमारेंना...’ असे कॅप्शन देत तिने फोटो शेअर केला आहे.

शशांक खेतान दिग्दर्शित, हा चित्रपट 10 जून 2022 रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. हिरू यश जोहर, करण जोहर, अपूर्व मेहता आणि शशांक खेतान यांनी Viacom18 स्टुडिओच्या सहकार्याने त्याची निर्मिती केली आहे.