
मनमोहक सौंदर्य आणि अप्रतिम नृत्यकौशल्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिनं नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत.

लाल रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये तिने खास फोटोशूट केलं असून त्याचेच फोटो तिने पोस्ट केले आहेत.

लाल छडी मैदान खडी.. असं म्हणत नेटकऱ्यांनी तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे. मात्र यामध्ये अभिनेत्री नेहा पेंडसेच्या कमेंटने विशेष लक्ष वेधून घेतलं आहे.

हृदय, डोळे फक्त तुझ्यासाठीच.. असं कॅप्शन संस्कृतीने तिच्या या फोटोंना दिलं आहे. त्यावर नेहाने मस्करीत तिला विचारलं, 'कोणासाठी?'

नेहाच्या या प्रश्नाचं उत्तर देताना संस्कृतीने लिहिलं, 'जे कोणी असतील, त्यांना समजलं असेलच'. त्यावर नेहा पुढे म्हणाली, 'अगं बाई, या मुलीने अनेकवचन वापरलं आहे.'

नेहा आणि संस्कृतीच्या या संवादाने नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. संस्कृतीनं कोणाकडे इशारा केला आहे, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

संस्कृतीच्या या फोटोशूटवर चाहत्यांकडूनही लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.