
‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेतील ‘येसूबाई’ फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. सोशल मीडियावर ती नेहमीच आपले नवनवीन फोटो शेअर करत असते.

नुकतेच प्राजक्ताने साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाचे दर्शन घेतले. ‘येळकोट येळकोट जय मल्हार....’ म्हणत प्राजक्ताने हा जेजुरी गडाच्या दिशेने मार्गक्रमण केले.

यावेळी प्राजक्ताने चक्क खंडेरायाची 42 किलो वजनाची खंडा तलवार उचलली आणि ‘सदानंदाचा येळकोट… येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोष देखील केला.

प्राजक्ताने खंडा तलवार उचलतानाचे फोटो तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर भरपूर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

’42 किलोची तलवार कशी काय उचलली, हे करायला खरंच प्रामाणिक भक्ती लागते..’, ‘महाराष्ट्राची वाघीण’, ‘जय मल्हार’ म्हणत चाहत्यांनी प्राजक्ताच्या या पोस्टवर भरभरून कमेंट्स केल्या आहेत.