
झी मराठीवरील शिवा ही मालिका लोकांच्या पसंतीला उतरतेय. या मालिकेतील शिवा आणि आशुतोष ही पात्र लोकांना आपलीशी वाटत आहेत.

डॅशिंग शिवाची सर्वत्र चर्चा आहे. नेहमी मालिकांमध्ये दिसणाऱ्या पात्रांपेक्षा शिवा हे कॅरेक्टर वेगळं आहे. त्यामुळे प्रेक्षकांना ते आवडतं आहे.

आता शिवा ही मालिका वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे... इथून मागे कायम भांडणं करताना दिसणारी शिवा आणि आशुतोष यांच्यात आता मैत्रीचं नातं फुलू लागलं आहे.

आशुतोषने शिवाकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. आता आशुने दिलेला मैत्रीचा प्रस्ताव शिवानेही मान्य केलाय. त्यामुळे या दोघांमध्ये मैत्रीचं नातं सुरु झालंय.

विशेष म्हणजे आशुतोषनं शिवासाठी खास कविताही केली आहे. त्यामुळे हळूहळू फुलू लागलेली या दोघांमधली मैत्री आता या मालिकेला कोणतं नवं वळण देणार हे पाहावं लागेल.