‘सीआयएसएफ’कडून ‘या’ पदांसाठी भरती, सरकारी नोकरी करण्याची संधी, लगेचच करा अर्ज
CISF Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे सरकारी नोकरी करण्याची संधी असून लगेचच अर्ज करा. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहे. उमेदवारांनी वेळ वाया न घालता अर्ज करावीत.

सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (सीआयएसएफ)मध्ये नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी लगेचच अर्ज करावीत.

विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 मे 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला भरतीसाठी अर्ज करावी लागणार आहेत.

100 पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. सरकारी नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे नक्कीच चालून आलीये. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. https://www.upsconline.nic.in या साईटला जाऊन आपल्याला भरतीसाठी अर्ज करावी लागणार आहेत.

20 ते 25 वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. 200 रूपये फीस ही भरती प्रक्रियेसाठी आपल्याला भरावी लागणार आहे.