कानाखाली लगावली, थेट खाली खेचलं, अभिजित दीपकेवर हल्ला कसा झाला? आंदोळनस्थळी काय घडलं?
जयपूरमधील आंदोलनात एक धक्कादायक घटना घडली आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्यावर आंदोलनादरम्यान हल्ला झाला आहे. आंदोलनात घुसलेल्या चार ते पाच जणांनी दीपके यांच्यावर हल्ला केला आहे. या घटनेने अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

कॉकरोच जनता पार्टीकडून (सीजेपी) देशभरात आयोजित केल्या जाणाऱ्या आंदोलनाची जोरदार चर्चा होत आहे. नीट परीक्षेतील घोटाळ्याविरोधात हे आंदोलन केले जात आहे. 15 जून रोजी सीजेपीकडून राजस्थानमधील जयपूर येथे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनाला हजारोंच्या संख्येने तरुण, तरुणी उपस्थित होते.

दरम्यान, याच जयपूरमधील आंदोलनात एक धक्कादायक घटना घडली आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्यावर आंदोलनादरम्यान हल्ला झाला आहे. आंदोलनात घुसलेल्या चार ते पाच जणांनी दीपके यांच्यावर हल्ला केला आहे. या घटनेने अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार अभिजित दीपके हे जयपूरमधील आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी आंदोलनात मोठ्या संख्याने लोक सहभागी झाले होते. अभिजित दीपके यांना काही आंदोलकांनी खांद्यावर घेतले होते. याच वेळी आंदोलनात सहभागी झालेल्या एका व्यक्तीला दीपके यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर त्यांना खाली खेचण्यात आले.

दीपके यांना खाली खेचल्यानंतर चार ते पाच जणांनी दीपके यांना मारहाण केली. ही घटना घडताच आंदोलनस्थळी तणाव निर्माण झाला. कोणतीही चुकीची घटना घडू नये यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था होती. परंतु तरीदेखील दीपके यांच्यावर हल्ला करून त्यांना मारहाण करण्यात आली.

दरम्यान, ही घटना घडल्यानंतर आता पोलीस यंत्रणा सक्रीय झाली आहे. पोलिसांकडून याप्रकरणाची चौकशी केली जात आहे. या हल्ल्यामागे नेमकं कोण होत? हे अद्याप तरी समोर आलेले नाही.