Abhijeet Dipke loan: ज्याने अख्खा देश हलवून सोडला, त्या अभिजीत दीपकेवर किती कर्ज? कुटुंबीयांनी दिली मोठी माहिती
Abhijeet Dipke loan: कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दीपके सध्या चर्चेत आहे. त्याच्या वडिलांनी आता मोठी अपडेट दिली आहे. त्यांनी अभिजीतवर किती कर्ज आहे याचा खुलासा केला आहे.

Abhijit Dipke
Image Credit source: Tv9 Marathi
- कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दीपके सध्या चांगलाच चर्चेत आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी त्यांनी दिल्ली येथील जंतर मंतर येथे आंदोलन पुकारले होते. लाखो विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. त्यानंतर अभिजीत दीपके चर्चेत आला. आता अभिजीतविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.
- नुकताच अभिजीत दीपकेचे वडील भगवान दिपके यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अभिजीतविषयी अनेक गोष्टींबाबत खुलासा केला.
- सीजेपीचे आंदोलन पाहून अनेकांनी त्यांच्या फंडींगवर प्रश्न उभारले. तसेच अभिजीत दीपकेकडे एकून किती संपत्ती आहे? हे देखील सर्च करु लगाले.पण अभिजीत हा मध्यम वर्गीय कुटुंबातून आलेला मुलगा आहे.
- अभिजीतच्या वडिलांनी सांगितले की, अभिमान वाटतो तो देशसेवा करत आहे. आम्ही लोन काढून त्याला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं होतं, 60 लाख रुपये लागले आहेत.
- पुढे ते म्हणाले, प्रत्येक वडिलांची इच्छा असते की मुलांना चांगलं काम कराव कुठेतरी अधिकारी व्हावं, पण त्याने आता हे निवडले आता आम्हाला त्याच्यासोबत राहणार आहे. सुरुवातीला आम्हाला वाटायचं आणि थोडे वेगळे वाटायचे. मात्र, आता या सगळ्या घटना बघून, त्याला पाठिंबा आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us