बारामतीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, इमारती खचल्या, कालवा फुटला, Exclusive Photos

बारामतीमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे, शहराला पावसानं झोडपून काढलं आहे, पावसामुळे तीन इमारती खचल्या आहेत.

| Updated on: May 25, 2025 | 8:49 PM
1 / 7
मुसळधार पावसानं बारामतीला झोडपलं आहे, पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे, जोरदार पाऊस झाला आहे.

मुसळधार पावसानं बारामतीला झोडपलं आहे, पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे, जोरदार पाऊस झाला आहे.

2 / 7

मुसळधार पावसामुळे बारामतीमधील तीन इमारती खचल्या आहेत, दरम्यान आता एनडीआरएफचं पथक देखील घटनास्थळी दाखल होणार आहे.

3 / 7

खचलेल्या या इमारतीमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे. लवकरच या ठिकाणी एनडीआरएफचं पथक दाखल होण्याची शक्यता आहे.

4 / 7

दरम्यान या मुसळधार पावसाचा फटका हा बारामतीमधील वाहतुकीला देखील बसला असून, मोठ्या प्रमाणात वाहतुककोंडी निर्माण झाली आहे.

5 / 7

सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर असून, कोणाच्याही जीवाला धोका होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.

6 / 7

दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा, काळजी घ्या असं आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीमधील नागरिकांना केलं आहे.

7 / 7

संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्येच पाऊस सुरू आहे, पुणे जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलं आहे. या पावसामध्ये मोठं नुकसान झालं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us