
लिंगपिसाट अशोक खरात या प्रकरणाने सध्या राज्यात खळबळ माजली आहे. या प्रकरणी दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. अशोक खरातने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार करुन बलात्कार केल्याची तक्रार समोर येताच अटक करण्यात आली. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोंदूबाबा अशोक खरातची कुंडली बाहेर काढली आहे. त्याच्याकडे एकूण किती संपत्ती आहे? त्याचे CA कोण होते? त्याने नेमकं हे सर्व कसं केलं? हे सर्व सांगितले आहे.

अशोक खरातच्या एकूण संपत्तीविषयी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आरोपीची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे याची माहिती घेतली आहे. मिरगाव येथे ३३ एकर, पाथर्डी गाव १० एकर, नाशिक सिन्नर १० एकर, राहता अहिल्यानगर साडेचार एकर, काकडी तालुका शिर्डा विमानतळ ५.५ एकरट, पाथर्डी फाटा फ्लॅट, ओझर जिल्हा नाशिक पाच गुंठ्याचा प्लॉट, पनवेल ४० गुंठे प्लॉट, कॅनडा कोर्ट नाशिक ऑफिस १८० स्क्वेअर फूट, संगमनेर मुलीच्या नावावर ८० गुंठे प्लॉट, पुणे मुलीच्या नावावर प्लॉट,

पुढे ते म्हणाले, नाशिक कर्मयोगी नगर बंगला, शिर्डी तालुका राहता साई सिल्व्हर ओक मंगल कार्यालय, सिन्नर पाच जणात सहा एकर जमीन, मिरगाव फार्महाऊस, स्वत:कडे १२ तोळे सोने, पत्नीकडे २० तोळे सोने, पत्नीच्या नावे डीमॅट अकाऊंटवर एक ते दोन लाख गुंतवणूक, पाच बँक खाते, ४० कोटी ८७ लाखाचे बाजारमूल्य आहे.

पुढे अशोक खरातच्या सीएविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सीए कोण आहे? त्याने कोणत्या देशात प्रवास केला तर अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, यूएई, साऊथ आफ्रिका, युथोपिया, टांझानिया, मलेशिया, पेरू, केनिया, युगांडा कंबोडियात प्रवास अशी माहिती समोर आली आहे.

तसेच अशोक खरातने त्याच्या नातेवाईंकांच्या नावावर तर संपत्ती घेतली नाही ना? याची चौकशी करण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. आरोपीच्या नातेवाईकांवर असलेल्या प्रॉपर्टीची माहिती घेत आहेत. आरोपीने कर चुकवेगिरी केली असेल तर आयकर विभाग कारवाईसाठी पत्रव्यवहार करणार आहे. खरात सोबत वरिष्ठ अधिकाऱ्याने आर्थिक गैरव्यवहार केला का याची चौकशी सुरू आहे शिवनिका संस्थान कार्याकारी संचालक मंडळाची सखोल चौकशी करण्यात येत आहेत. इतरही संस्था किंवा ट्र्स्ट असेल तर त्याची चौकशी सुरू आहे. त्यातील कार्यकारी मंडळाची चौकशी करण्यात येईल असे ते पुढे म्हणाले.