
'TV9 मराठी'च्या वतीने 'आपला बायोस्कोप 2023' हा पुरस्कार सोहळा मुंबईतल्या सहारा हॉटेलमध्ये अत्यंत दिमाखात पार पडला. मराठी चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजन विश्वातील अनेक दिग्गज कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली.

मराठी मनोरंजन क्षेत्रात भरीव योगदान देणारे कलाकार आणि समूह यांच्या कामाचा गौरव यावेळी करण्यात आला. गेल्या दोन दशकांत मराठी सिनेसृष्टीने मोठी झेप घेतल्याचं पहायला मिळालं.

मनोरंजनासोबतच विविध विषय मराठी कलासृष्टीने अत्यंत समर्थपणे हाताळले. अभिरुचीसंपन्न आणि चोखंदळ मानल्या जाणाऱ्या मराठी प्रेक्षकांनी अशा अनेक कलाकृती अक्षरश: डोक्यावर घेतल्या.

मालिका आणि सिनेजगतातील उत्कृष्ट कलाकृतींचा गौरव 'आपला बायोस्कोप 2023' या पुरस्काराच्या माध्यमातून केला गेला. यावेळी कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून या पुरस्कार सोहळ्याचं देखील कौतुक झालं. पुरस्कारासाठी विविध श्रेणी निश्चित करुन पब्लिक वोटिंग आणि ज्युरीच्या माध्यमातून कलाकारांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कार सोहळ्यातील काही खास क्षण... TV9 चे CEO बरुण दास आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कलाकारांना शुभेच्छा देत मराठी चित्रपटांचं आणि त्यांच्या कामाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तोंडभरून कौतुक करण्यात आलं. टीव्ही9 मराठीच्या आपला बायोस्कोप पुरस्कार सोहळ्यामुळे कलाकारांची मांदियाळी एकाच ठिकाणी जमली, गाठीभेटी झाल्या.