
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात 15 दिवसांची संचारबंदी जाहीर केली आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक सारख्या सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांच्या लाईव्हदरम्यान अनेक चित्रविचित्र कमेंट्सही पाहायला मिळाल्या. माझा साखरपुडा आहे, इथपासून माझा वाढदिवस असल्याने पार्टी टाळण्यासाठी हॉटेल बंद करा, अशा भन्नाट मागण्या नेटिझन्सनी केल्या

सर नका लावू लॉकडाऊन, माझं प्रीव्हेडिंग शूट करायचं आहे, अशी विनवणी एका तरुणीने केली

ए शुभम, तू लाईव्ह पाहत असशील तर प्लीज भावा माझे एक हजार रुपये परत दे, आता लॉकडाऊन होणार रे, असंही एका नेटिझनने कोण्या एका शुभमला लिहिलं

शनिवार-रविवारी लॉकडाऊन ठेवू नका, आम्ही ट्रेक प्लॅन केला आहे, अशी कमेंट एका अस्सल ट्रेकप्रेमी युवकाने केली

कॅमेराबद्दल सूचना करणाऱ्या काही कमेंट्सही मुख्यमंत्र्यांच्या लाईव्हदरम्यान सुरु होत्या

हॉटेल बंद करा, माझा वाढदिवस जवळ येतोय, अशी भन्नाट मागणीही एका युझरने केली होती

काका प्लीज लॉकडाऊन नको, मला गोव्याला जायचं आहे, अशी बापुडी विनवणी एका तरुणाने केली

माझ्या फ्रेण्डचा बर्थडे आहे, प्लीज लॉकडाऊन नका ठेवू, मागच्या वर्षी पण त्याने पार्टी दिली नव्हती, अशी कमेंट वाचून सर्वांनाच हसू फुटले

लॉकडाऊन नको प्लीज सर माझा साखरपुडा आहे, अशी विनंती करणारी प्राची मागील वेळी इन्स्टाग्राम लाईव्हला चांगलीच गाजली होती