
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घरात साप घुसण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते, सापांच्या बिळात पाणी घुसल्यानं ते बिळातून बाहेर पडतात आणि सुरक्षित निवाऱ्याच्या शोधात घरात घुसतात.

असाच एक प्रकार बुलढाणा तालुक्यातील सावळा गावात देखील घडला आहे. येथील रहिवासी असलेल्या लखन गाडेकर यांच्या घराच्या परिसरात साप निघाल्यानं एकच गोंधळ उडाला.

त्यानंतर गाडेकर यांनी तातडीनं सर्पमित्रांशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली, सापाची माहिती मिळाल्यानंतर सर्पमित्र तातडीनं घटनास्थळी दाखल झाले.

सर्पमित्रांनी या नागाला पकडले , मात्र तो त्यांच्या हातातून निसटला आणि त्यांच्याच दुचाकीत जाऊन लपला

कोब्राला शोधण्यासाठी सर्पमित्रांना जीवाची पराकाष्ठा करावी लागली, शेवटी कोब्रा दुचाकीच्या चैन कव्हरमध्ये दिसला.मात्र त्याला काढायचे कसे, असा प्रश्न सर्पमित्रांना पडला होता.

त्यांनी मेकॅनिक बोलावला, मात्र तो सुद्धा दुचाकीचे पार्ट वेगळे करायला भीत होता.

तेव्हा सर्पमित्रांनीच चैन कव्हर काढून नागाला तब्बल दोन तासांनंतर रेस्क्यू केलं.हा सर्व थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.