Weather Update : कोकणाच्या किनारपट्टीवर संकट, राज्याच्या हवामानात मोठा बदल, विदर्भात..

Weather Update : भारतीय हवामान विभागाने नुकताच मोठा इशारा दिला. राज्यातील हवामानात मोठा बदल झाल्याचे बघायला मिळत आहे. त्यातच कोकणकिनारपट्टी भागात संकट आले असून राज्यातील हवामानावर परिणाम झाला.

| Updated on: Nov 25, 2026 | 7:30 AM
1 / 5
राज्यातून गुलाबी थंडी गायब झाली. एल निनोचा परिणाम जाणवत आहे. एप्रिलपर्यंत एल निनोचे भयंकर परिणाम दिसतील, असे सांगितले जात आहे.एल निनोमुळे राज्यात समाधानकारक पाऊस झाला नाही, आता कडाक्याची थंहीही होणार नसल्याचे सांगितले जात आहे.

राज्यातून गुलाबी थंडी गायब झाली. एल निनोचा परिणाम जाणवत आहे. एप्रिलपर्यंत एल निनोचे भयंकर परिणाम दिसतील, असे सांगितले जात आहे.एल निनोमुळे राज्यात समाधानकारक पाऊस झाला नाही, आता कडाक्याची थंहीही होणार नसल्याचे सांगितले जात आहे.

2 / 5

डिसेंबरमध्ये वेस्टर्न येण्याची शक्यता असून उत्तरेकडे भयंकर थंडी होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील काही भाग बघता हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. कोकण आणि गोवा किनारपट्टी भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली.

3 / 5

त्यामुळे काही भागातून गारठा गायब झाला असून ढगाळ वातावारण झाले. नाशिकसह राज्यात कमाल तापमानात वाढ झाल्याचे बघायला मिळाले. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यात थंडी चांगली राहण्याचा अंदाज आहे.

4 / 5

त्यातच कोल्हापूर घाटमाथा, सातारा, सांगली, पुणे आणि कोल्हापूर येथे सरासरीपेक्षा कमी तापमान राहण्याची शक्यता आहे. विदर्भात 8 जिल्ह्यांमध्ये थंडी कमी अधिक होण्याचा अंदाज आहे. आजही राज्यात तापमान सामान्यच राहिल.

5 / 5

राज्यात गारठा कमी झाला असून उकाडा वाढण्याची शक्यता आहे. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढउतार बघायला मिळेल. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us