Weather Alert : उत्तरेकडून वेगाने येतंय मोठं संकट, IMD चा थेट अलर्ट, राज्यभरात..

Weather Alert : भारतीय हवामान विभागाकडून मोठा अलर्ट नुकताच जारी करण्यात आला. हवामान विभागाने मोठा इशारा दिला. राज्यात हवामानात मोठा बदल बघायला मिळेल. राज्यात पुन्हा वारं फिरलं आहे.

| Updated on: Nov 14, 2026 | 9:13 AM
1 / 5
हवामनात सातत्याने बदल होताना दिसत आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. उत्तर आणि पश्चिम दिशेकडून वाहणाऱ्या हवामानाने तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

हवामनात सातत्याने बदल होताना दिसत आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. उत्तर आणि पश्चिम दिशेकडून वाहणाऱ्या हवामानाने तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

2 / 5

त्यामुळेच पहाटे थंडी जाणवत आहे. मुंबई, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये थंडी वाढण्याची शक्यता असून पावसाचा कोणताही इशारा देण्यात आला नाही.

3 / 5

सांगली, सातारा, पुणे, बीड, अहिल्यानगर, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यातही थंडीचा मोठा इशारा हवामान विभागाने दिला. पाच दिवसात कमाल तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.

4 / 5

नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, भंडारा, अकोला या जिल्ह्यात थंडी अधिक वाढणार आहे. कमाल तापमान 31 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला.

5 / 5

पुण्यात पुढील काही तासात वातावरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. थंडीत चांगलीच वाढ होऊ शकते. हवामान विभागाने याबाबत इशारा दिला. राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीची चाहूल जाणवत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us