
ऑनलाइन हॉटेल बुकिंग करताना, तुम्हाला तुमच्या रूमचे आकर्षक फोटो दाखवले जातात. मात्र अशा फोटोंमुळे तुमची दिशाभूल होऊ शकते.

ऑनलाइन बुकिंग करताना आपण अनेकदा अटी आणि शर्ती वाचत नाही. या अटी आणि शर्तींमुळे नंतर मोठ्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे हॉटेल बुकिंग करण्यापूर्वी अटी एकदा स्पष्टपणे वाचा.

ऑनलाइन बुकिंग करताना आपल्याला हॉटेल मोक्याच्या ठिकाणी आहे असं दाखवलं जातं. मात्र प्रत्यक्ष ठिकाण हे वेगळं असतं. त्यामुळे हॉटेल बूक करताना ठिकाणाची माहिती मिळवा.

ऑनलाइन हॉटेल बुक करताना अनेकजण भाडे तपासत नाही. कारण एकाच हॉटेलसाठी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे दर असू शकतात. त्यामुळे तुमची फसवणूक होण्याची शक्यता असते.

ऑनलाइन बुकिंग करताना ऑफर्सच्या नावाखाली फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला हॉटेल बुकिंगची ऑफर किंवा दर संशयास्पद वाटत असेल, तर बुकिंग एकदा क्रॉस चेक करा.